
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार ऐन दिवाळीच्या दिवशी समोर आलेला असून कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवाळीच्या पूर्वसंध्येला एका विवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी तात्काळ सासरच्या मंडळीच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , रितू राहुल पटले ( वय 26 वर्ष राहणार कोराडी नागपूर ) असे मयत विवाहितेचे नाव असून याप्रकरणी यांच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. आपल्या मुलीला सासरी लहान लहान कामावरून तसेच हुंडा कमी दिला म्हणून त्रास दिला जात होता असे देखील त्यांचे म्हणणे आहे.
रितू हिचा विवाह राहुल राजेश पटले ( वय 32 वर्ष राहणार ओमनगर कोराडी नागपूर ) याच्यासोबत दहा मे 2023 रोजी झालेला होता मात्र लग्नानंतर अवघ्या काही महिन्यात सासू रेखा पटले ( वय 54 ), ननंद रानी रानगडाले ( वय 33 राहणार नागपूर ) आणि मिनू यांनी तिला लग्नात हुंडा कमी आणला म्हणून छळ करण्यास सुरुवात केलेली होती.
सर्व आरोपींनी रितू हिला छोट्या छोट्या गोष्टींवरून शिवीगाळ करत मारहाण केली धमकी देण्यास सुरू केले. रितू हिच्या वडिलांनी दिलेले सहा तोळे सोने आणि जावयाला दिलेले अडीच तोळे सोने सर्व काही स्वतःकडे ठेवून घेतले आणि त्यानंतर तुला इथे राहण्याचा हक्क नाही अशा स्वरूपात दमदाटी करत होते त्यानंतर आपल्या मुलीने टोकाचे पाऊल उचलले असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे.