‘ तुम्हे चिर दूंगा ‘ म्हणत पुण्यात सोसायटी मीटिंगमध्ये महिलेला ढकललं

शेअर करा

पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. साळुंखे विहार रस्त्यावरील एस आर ए कमेला हाऊसिंग सोसायटी सोसायटीच्या देखभालीसाठी म्हणून आयोजित करण्यात आलेल्या एका मीटिंगमध्ये एका महिलेला अर्वाच्च भाषेत बोलून तिला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे.

सदर प्रकरणी महिलेने परवेज अशोक चौधरी ( वय 40 वर्ष राहणार एस आर ए इमारत कमेला सोसायटी ) याच्या विरोधात कोंडवा पोलिसात तक्रार दिली आहे . पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केलेली असून तपासाला सुरुवात केली आहे.

एसआरए कमेला सोसायटी इथे मागील चार वर्षांपासून थकलेले विज बिल पाण्याची समस्या आणि बंद असलेली लिफ्ट या कारणासाठी रहिवाशांनी मीटिंग बोलवलेली होती. मीटिंगमध्ये सोसायटीची देखभाल आणि लिफ्टचे कामकाज पाहणारा परवेज हा देखील यावेळी उपस्थित होता. महिलेने त्याला लिफ्ट बंद का केली ? असा प्रश्न विचारला तर त्याने महिलेच्या अंगावर धावून जात चाव्या तिच्याकडे फेकून दिल्या.

महिलेच्या म्हणण्याप्रमाणे परवेज याने , ‘ जाओ मुझे नही करना है काम ‘ असे म्हणत मग तुम्हे चिर दूंगा अशी भाषा वापरली त्यानंतर सर्वांसमक्ष दोन्ही हाताने चौधरी याने महिलेला ढकलून दिले. त्याने असा प्रकार केल्यानंतर महिला घाबरून गेली आणि आपल्या जीवाचे बरे वाईट होऊ नये म्हणून अखेर कोंढवा पोलिसात आरोपीच्या विरोधात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे करत असल्याची माहिती आहे


शेअर करा