
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर येथे समोर आलेला असून ऊस तोडीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिला मुकादमाला आणि तिच्या पतीला लोखंडी गजाने आणि काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. राहेगाव येथे ही घटना 14 तारखेला रात्रीच्या सुमारास घडली असून 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , संगीता म्हसू पवार या ऊसतोड मजुरांच्या मुकादम म्हणून काम करत असून वेगवेगळ्या साखर कारखान्यांना मजूर पुरवण्याचे काम त्या करतात. सोनवाडी येथील काही मजुरांना त्यांनी उचल दिली होती मात्र उचल दिल्यानंतर देखील ते ऊस तोडणीला आले नाहीत म्हणून संगीता पवार आणि त्यांचे कुटुंबीय दिलेली रक्कम मागण्यासाठी म्हणून मजुरांच्या घरी गेलेले होते.
मुकादम पैशासाठी आपल्या घरी आलेले होते म्हणून याचा राग आल्यानंतर सर्व मजुरांनी संगीता पवार आणि त्यांचे पती म्हसू पवार यांना राहेगाव येथे त्यांच्या घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांनी आरोपींनी केलेल्या मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी झालेले आहेत. पुन्हा पैसे मागायला आले तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी देखील आरोपींनी त्यांना धमकी दिली आहे.
अशोक साहेबराव मोरे , संतोष गोरख सोनवणे , चांगदेव गोपीनाथ सोनवणे , दीपक चांगदेव सोनवणे , मोतीलाल कारभारी झाल्टे , अण्णा कारभारी झाल्टे , संतोष नाथाबा झाल्टे , संगीता संदीप झाल्टे, प्रवीण दादासाहेब गायकवाड, विशाल विजय गायकवाड , अभिषेक विजय गायकवाड ( सर्वजण राहणार सोनवाडी ) अशी आरोपींची नावे आहेत. पुढील तपास पोलीस नाईक जीवन पाटील करत असल्याची माहिती आहे.