सासरा सावत्र सुनेबरोबर ‘ नको त्या ‘ अवस्थेत आढळला , सासूने गोळी घेतली नाही म्हणून..

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या उत्तर प्रदेशातील झाशी इथे समोर आलेले असून सासऱ्याचे चक्क त्याच्या सावत्र सुनेशी अनैतिक संबंध असल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे . सासूला हा प्रकार कळाला म्हणून त्यांच्या कुटुंबात वाद होऊ लागले आणि अखेर वादाला कंटाळून सासर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , झाशीतील तोडी फतेहपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका कुटुंबात हा प्रकार समोर आलेला असून मयत सासऱ्याचे त्याच्या सावत्र सुनेसोबत अनैतिक संबंध होते . सासूने दोघांना आक्षेपार्ह परिस्थितीत पाहिले आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबात वाद होऊ लागले अखेर वादाला कंटाळून 18 तारखेला सासर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केली असून प्रकृती बिघडल्यानंतर रविवारी त्यांचा मृत्यू झालेला आहे.

सासूच्या म्हणण्याप्रमाणे , ‘ सासरी आल्यानंतरच सून घरात भांडण करत असायची अखेर तिच्या भांडणाला वैतागून मुलगा दिल्लीला नोकरीसाठी निघून गेला आणि त्यानंतर सासर्‍याचे आणि सुनेचे अनैतिक संबंध तयार झाले. दोघांचीही या संबंधाला संमती होती आणि सासू आणि सून घरात बसूनच सोबत दारू देखील प्यायचे . सून ही मला रोज झोपेची गोळी द्यायची मात्र त्यानंतर ते अनैतिक संबंध ठेवत असल्याचा मला संशय होता त्यामुळे मी एक दिवस ती गोळी घेतली नाही आणि त्यांना रंगेहाथ हात पकडले . सून ही सासऱ्यासोबत राहण्यास इच्छुक होती , ‘ असे देखील तिने म्हटलेले आहे.

सासूने पुढे म्हटले की , आपल्या पतीला सुनेसोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर आमच्यात भांडण झाले आणि हा प्रकार मुलाला सांगितला . मुलगा दिल्ली वरून परतला त्यानंतर मुलगा सासरा आणि सून यांच्यात जोरदार भांडण झाले त्यानंतर सासरा खूप दारू पिला आणि विष प्राशन केले . ‘ पोस्टमार्टम झाल्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.


शेअर करा