‘ ज्यूस कॅन्सल ‘ म्हणताच आठ जणांनी घेरलं अन.., पोलिसात गेले प्रकरण

शेअर करा

सासऱ्याचे अपहरण

उल्हासनगर मधील एका ज्यूस सेंटरच्या मालकाने आठ ते दहा जणांसोबत मिळून एका ग्राहकाला बेदम मारहाण केलेली आहे . फिर्यादी यांचे वय वीस वर्षे असून रात्री उशिरा वेळेत ज्यूस मिळाला नाही म्हणून ज्यूसची ऑर्डर रद्द केली मात्र नाराज झालेल्या मालकाने त्यानंतर ग्राहकाला मारहाण केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बालकंजी बारी परिसरातील दीपेश जयंती वाघेला ( वय 20 ) हा व्यक्ती रेडिमेड कपडे विकत असून रात्री अडीचच्या सुमारास गोल मैदान परिसरात पिंटू सेंटरमध्ये त्याचा मित्र आदित्य याच्यासोबत गेलेला होता . त्यांनी ज्यूसची ऑर्डर दिली मात्र बऱ्याच उशिरा ज्यूस आला म्हणून त्याने ज्यूस नाकारला.

सदर प्रकारानंतर दीपेश आणि ज्यूस सेंटरचा मालक पिंटू गुप्ता यांच्यात वाद झाला त्यानंतर पिंटू आणि त्याच्या साथीदारांनी दीपेश यास आठ ते दहा जणांच्या साथीदारांनी मिळून मारहाण केली. दीपेश जखमी झाल्यानंतर त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केलेली आहे . पोलिसांनी पिंटू गुप्ता, अमित व इतर आठ ते नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.


शेअर करा