बायको प्रियकरासोबत ‘ नको त्या ‘ अवस्थेत शेतात , उभ्या पिकाला लावली काडी

शेअर करा

देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या उत्तर प्रदेशातील बरेली इथे समोर आलेले असून स्वतःची बायको प्रियकरासोबत शेतामध्ये नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या पतीने बायकोला शेतामध्येच पेटून दिलेले आहे . आपल्या प्रेयसीला पेटून दिलेले पाहताच प्रियकराने तेथून पलायन केलेल्या असून तिचा होरपळून अखेर मृत्यू झालेला आहे

उपलब्ध माहितीनुसार , उत्तर प्रदेशातील बरेली येथील ही घटना असून नेपाल सिंह असे आरोपी पतीचे नाव आहे . नेपाल सिंह याच्या पत्नीचे गावातील एका तरुणांसोबत अनैतिक संबंध जुळलेले होते आणि त्यानंतर दोघे एके दिवशी शेतामध्ये गेले होते . नेपाल सिंह याला सुरुवातीपासून संशय होता म्हणून तो बायकोपाठोपाठ गेला त्यावेळी प्रियकरासोबत त्याला त्याची बायको नको त्या अवस्थेत आढळून आली.

संतप्त झालेला नेपाल सिंह याने त्यानंतर बायकोला आणि तिच्या प्रियकराला जोरदार शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्याचा रुद्रावतार पाहता प्रियकर तेथून पळून गेला. आरोपीने त्यानंतर बायकोला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि शेताला आग लावून दिली. महिलेचा या घटनेत मृत्यू झालेला असून पोलिसांनी त्यानंतर घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलेला आहे.

आरोपीला तीन मुले असून आदल्या रात्री पत्नीने सगळ्यांना जेवू घातलेले होते त्यानंतर सगळेजण झोपी गेले आणि रात्री पतीला जाग आली त्यावेळी पत्नी जागेवर नव्हती . पतिला अंदाज असल्याकारणाने पतीने तिला शेतामध्ये प्रियकरासोबत शोधून काढले आणि त्यानंतर शेताला आग लावली त्यात तिचा होरपळून मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी आरोपीला सध्या अटक केलेली असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे .


शेअर करा