प्रेयसीनं ब्लॉक केलेलं पोलिसानं पाहिलं , तिला तिच्या घरी सोडलं अन..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार मुंबईत समोर आलेला असून प्रेयसीसोबत भांडण झाल्यानंतर पोलिसाने वरळी पोलीस वसाहतीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या पोलीस शिपायाने प्रेयसीच्या एका मैत्रिणीला तो गळफास घेत असल्याचा फोटो व्हाट्सअपवर पाठवला होता.

उपलब्ध माहितीनुसार , इंद्रजीत साळुंखे ( वय 27 ) असे मयत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून गोरेगाव परिसरात राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीसोबत त्याचे प्रेम संबंध जुळलेले होते . रविवारी तो प्रेयसीला भेटला आणि साळुंखे हा दुसऱ्या एका मुलीसोबत चॅटिंग करतो यावरून त्यांचे आणि त्याच्या प्रेयसीचे भांडण झालेले होते.

साळुंखे यांनी त्यानंतर त्याच्या प्रेयसीला दादरला नेऊन सोडले आणि तिचा मोबाईल तपासण्याच्या वेळी प्रेयसीने त्याला ब्लॉक केल्याचे त्याच्या लक्षात आले . इंद्रजीत यांनी अखेर राहत्या घरी येऊन प्रेयसीच्या मैत्रिणीला व्हाट्सअपवर गळफास घेत असल्याचा फोटो पाठवला आणि त्यानंतर टोकाचे पाऊल उचलले.


शेअर करा