महाराष्ट्र हादरला..अवघ्या तीन वर्षीय चिमुरडीवर कामगाराकडून अत्याचार

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत संतापजनक अशी घटना बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात समोर आलेली असून कापड दुकानात काम करणाऱ्या एका अल्पवयीन कामगाराने मालकाच्या अवघ्या तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केलेले आहेत. शुक्रवारी ही घटना समोर आल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण असून अल्पवयीन मुलाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , शहरातील एका कापड दुकानात पंधरा वर्षांचा अल्पवयीन मुलगा कामाला होता त्यावेळी मालकाची तीन वर्षांची मुलगी खेळत असताना ती एकटी असल्याचा असल्याचे हेरून आरोपी मुलाने तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या हि बाब लक्षात आल्यानंतर गेवराई पोलीस यांनी तिथे धाव घेतली. अल्पवयीन मुलाला सध्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले असून पुढील तपास पिंक पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षण प्रफुल्ल साबळे करत आहेत.


शेअर करा