करकचून ब्रेक मारला अन तरुणीने गमावले प्राण , पुण्यातील घटना

शेअर करा

पुण्यात एक खळबळजनक आणि दुर्दैवी अशी घटना समोर आलेली असून पुण्यातील एका रिक्षाचालकाने बेदरकारपणा केला आणि त्यात एका तरुणीने आपले प्राण गमावलेले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , सिंहगड रोडवरील नवश्या मारुती मंदिर येथे 15 जुलै रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडलेली असून या घटनेमध्ये सपना राम राठोड ( वय 30 राहणार जांभुळवाडी रोड ) या तरुणीने प्राण गमावलेले आहेत . स्पीड ब्रेकरवर अचानकपणे ब्रेक दाबल्याने ही तरुणी रिक्षातून पडली आणि तिचा मृत्यू झालेला आहे.

मयत तरुणी यांची आई यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून त्यानंतर रिक्षाचालक असलेला किरण सुरवसे ( वय 32 राहणार कामठे वस्ती ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रात्री दोनच्या सुमारास सपना राठोड ह्या डेक्कन परिसरात जेवण करण्यासाठी जात होत्या त्यावेळी रिक्षाचालकाने अचानकपणे ब्रेक मारला आणि त्या रिक्षांमधून पडल्या. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालेला असून आरोपी रिक्षाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा