‘ आधारकार्ड ‘ काय दिलं अन लचांड मागं लागलं, हिंजवडीतील घटना

शेअर करा

महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून नेटवर्क मार्केटिंगमध्ये नोकरीला लावतो असे सांगत एका तरुणाकडून त्याचे आधार कार्ड घेण्यात आले आणि त्याच्या नावावर खाजगी फायनान्सचे सुमारे एक लाख 37 हजार रुपयांचे कर्ज काढण्यात आले . 28 जूनपासून तीन जुलैपर्यंत पुण्यातील हिंजवडी परिसरात ही घटना घडलेली असून तक्रारदार व्यक्ती यांना या प्रकाराची कल्पना देखील नव्हती असे त्यांचे म्हणणे आहे .

उपलब्ध माहितीनुसार , युवराज विठ्ठल कांबळे ( वय 26 राहणार थेरगाव ) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिलेली असून पोलिसांनी या प्रकरणात मोहित गोयल ( वय 32 ) , आकाश शिगळे , गोविंद पाटील यांच्यासोबत एका महिलेवर गुन्हा दाखल केलेला आहे.

तक्रारदार व्यक्ती यांना संशयित आरोपी यांनी एका ठिकाणी भेटण्यासाठी बोलवलेले होते त्यावेळी तुम्हाला नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम देतो असे सांगत दीड लाख रुपये भरण्यास सांगितले त्यावेळी तक्रारदार यांनी आपल्याकडे पैसे नाहीत असे सांगितल्यावर त्यांनी त्यांनी तू फक्त आधार कार्ड दे प्रत्येक आठवड्याला तुझ्या खात्यावर पैसे येतील असे सांगितले होते.

आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदार व्यक्ती यांनी त्यांना आधार कार्ड दिले त्यानंतर संशयित व्यक्तींनी परस्पर त्यांच्या एका खाजगी कंपनीतून तक्रारदार व्यक्ती यांच्या नावावर सुमारे एक लाख 37 हजार रुपयांचे कर्ज काढले आणि इतरही काही रक्कम असे करत आरोपींनी हे पैसे स्वतःच्या खात्यावर वळवून घेतले असे तक्रारदार व्यक्ती यांचे म्हणणे आहे.


शेअर करा