
पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना पाटस परिसरात समोर आलेले असून आपण वरिष्ठ पोलीस अधिकारी आहोत असे सांगत एका व्यक्तीने महिलेवर तब्बल नऊ वर्ष बलात्कार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. महिलेने प्रश्न विचारला त्यावेळी त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून 35 लाख रुपये देखील उकळलेले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , मनीष ठाकूर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून यवत पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . आरोपीने आपल्याला नेहमी मी स्वतः पोलीस आहे असे सांगितले होते मात्र प्रत्यक्षात ही बाब खोटी आढळून आली. आरोपीने महिलेला दमदाटी करत तिच्यासोबत तब्बल नऊ वर्ष शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि जर कुणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना ठार मारून टाकील अशी देखील धमकी तो देत असायचा मी, असेही पीडित महिलेचे म्हणणे आहे.
महिलेच्या म्हणण्याप्रमाणे , आरोपीच्या कुटुंबातील त्याची पत्नी आणि एक मुलगा आणि मुलगी यांनी देखील आपल्याला अनेकदा आपल्याला आपले अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्या बदल्यात 2015 पासून तर 2023 पर्यंत आपल्याकडून 35 लाख रुपये रोख स्वरूपात घेतलेले आहेत.
महिला पुढे म्हणते की , ‘ आरोपी मनीष ठाकूर हा स्वतःला पोलीस अधिकारी आहे असे सांगायचा आणि त्यातून आमची ओळख झालेली होती. मोठे मोठे पोलीस अधिकारी माझे मित्र आहेत. तू पोलीस स्टेशनला गेली तरी मला काही फरक पडणार नाही असेच सांगत पीडित महिलेला सातत्याने तो धमकावत होता. अनेक दिवस त्याच्या धमकीला घाबरून महिला शांत राहिली मात्र अखेर तिने हिम्मत करून पोलिसात धाव घेतली असे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितलेले आहे.