
महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अजब प्रकार सध्या पिंपरीत समोर आलेला असून मॅट्रिमोनियल साईटवरून ओळख झाल्यानंतर एका महिलेला तब्बल 18 लाख 46 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे. याप्रकरणी नऊ तारखेला हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तक्रारदार महिला यांचे वय 37 वर्ष असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादी महिला आणि आरोपी यांची एका मॅट्रिमोनियल साइटवर ओळख झालेली होती त्यावेळी आरोपीने त्याचे नाव हंसराज उर्फ अकुलमिना असे असल्याचे सांगितले. फिर्यादी महिला यांना त्याने लग्नाचे आमिष दाखवले आणि त्यांचा विश्वास संपादन करून नवीन घर घेण्यासाठी बँकेचे होम लोन पर्सनल लोन फायनान्स आदी माध्यमातून कर्ज काढण्यास सांगितले.
आरोपीने त्यानंतर शेअर मार्केटमध्ये त्यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले आणि आलेल्या नफ्यातून लोकांना उधार पैसे द्यायचे असे सांगितले . घरातील सामानासाठी देखील म्हणून त्याने 18 लाख 46 हजार रुपये फिर्यादी महिला यांच्याकडून लुबाडले. आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच महिलेने हिंजवडी पोलिसात धाव घेत फिर्याद दिलेली आहे.