
महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर इथे एक धक्कादायक प्रकरण सध्या समोर आलेले असून नात्यातल्या एका 23 वर्षीय तरुणावर सव्वीस वर्षीय विवाहित तरुणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला होता. पोलिसांनी त्याच्यावर प्राथमिक कारवाई देखील केली मात्र त्यानंतर देखील या महिलेने पतीसोबत त्याच्या घरी जात त्याला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर रविवारी महिलेवर आणि तिच्या पतीवर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आपल्यावर गुन्हा दाखल झालेला आहे हे लक्षात येताच महिला पोलीस आयुक्तालयात गेली आणि तेथील पायऱ्यावर अंगावर रॉकेल ओतून तिने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला . पोलिसांनी तात्काळ तिच्या हातातून काडेपेटी घेतली म्हणून तिचे प्राण बचावलेले आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या महिलेचे प्राण वाचवण्यात यश आलेले असून बेगमपुराचे उपनिरीक्षक विनोद भालेराव यांनी तात्काळ महिलेला रुग्णालयात दाखल केले.
26 वर्षीय तक्रारदार महिलेने 24 ऑगस्ट रोजी सिडको पोलीस ठाण्यात गोकुळ पाटोळे नावाच्या एका तरुणाच्या विरोधात तक्रार दिलेली होती. आरोपी तरुण हा महिलेचा नातेवाईक असून 18 ऑगस्ट रोजी पैशाच्या व्यवहारातून त्याने घरी येऊन गैरप्रकार केला असे सांगत त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेने न्यायालयासमोर जबाब देखील नोंदवला मात्र 2 सप्टेंबर रोजी पतीसह महिलेने गोकुळच्या घरी जात त्याला मारहाण केलेली होती त्यानंतर तिच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला होता. आपल्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे हे लक्षात आल्यानंतर तिने हा प्रकार केलेला असून सुदैवाने तिचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.