
महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अजब प्रकार मुंबईत समोर आलेला असून लग्न जुळवणाऱ्या एका वेबसाईटवर एका तरुणासोबत ओळख झाल्यानंतर तरुणीने लग्नाची सुखी स्वप्न रंगवण्यास सुरुवात केलेली होती मात्र लग्नापूर्वीच भावी नवरदेव तब्बल साडेबारा लाख रुपयांना गंडा घालून अखेर नॉट रीचेबल झालेला आहे . कांजूरमार्ग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , आरोपीने तरुणीला आपले वडील आणि आई दोघेही मयत असून वडिलांचा पेट्रोल पंपाचा बिजनेस आपण सांभाळत आहोत असे सांगत आपले नाव सूर्या असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोघांनी व्हाट्सअप नंबर देखील शेअर केले आणि व्हिडिओ कॉलवर देखील अनेकदा एकमेकांसोबत बोलणे केले. वेगवेगळ्या फोटोंच्या माध्यमातून त्याने तरुणीला चांगलीच भुरळ पाडली आणि त्यानंतर तरुणी त्याच्या बोलण्यात अडकत गेली.
पीडित तरुणीचे वय 27 वर्ष असून एका खाजगी कंपनीत ती काम करते. दरम्यानच्या काळात त्यांच्यात संपर्क होत असताना आरोपीस सूर्या याने आपल्याला पैशाची गरज आहे असे सांगत वेळोवेळी तिच्याकडून तब्बल साडेबारा लाख रुपये घेतले आणि त्यानंतर नॉट रीचेबल झाला. पीडित तरुणीने कांजूरमार्ग पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून सूर्या याने अशाच पद्धतीने आणखीन किती तरुणींची फसवणूक केलेली आहे याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.