
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून उत्तर प्रदेशातील हे प्रकरण आहे. उत्तर प्रदेशच्या बलिया इथे एक महिला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात गेलेली असताना बाहेर आल्यानंतर तिला भिकाऱ्याच्या वेशात एक माणूस दिसला . सुरुवातील तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले मात्र निरखून पाहिल्यानंतर तो चक्क दहा वर्षापासून बेपत्ता असलेला तिचा पती आढळून आलेला आहे.
आपल्या पतीला अचानक अशा अवस्थेत पाहून महिलेला अश्रू अनावर झाले आणि त्याला मिठी मारून ती जागीच रडू लागली. तिच्या अंगावरील वस्त्र तिने पतीच्या अंगावर टाकले आणि मुलालाही फोन करून ‘ बाबू पापा मिल गये है एक कुर्ता लेके आओ ‘ असे म्हणत तिने मुलाला देखील त्याचे वडील सापडल्याची माहिती दिली.
जानकीदेवी आणि मोतीचंद्र वर्मा असे या दांपत्याचे नाव असून महिलेचा पती मानसिकदृष्ट्या आजारी होता आणि दहा वर्षांपूर्वी अचानकपणे घर सोडून निघून गेलेला होता . त्याचे कुटुंबीय उत्तर प्रदेश , बिहार आणि नेपाळ इथपर्यंत देखील त्याचा तपास करून थकलेले होते मात्र अखेर तो रुग्णालयाच्या बाहेर आढळून आल्यानंतर या महिलेला देखील आनंदाश्रू अनावर झालेले होते .