
अनेक नागरिक सहजपणे समोरच्या व्यक्तीला खिजवण्यासाठी किंवा भांडण झाल्यानंतर त्याला आई बहिणीवरून शिवी देतात. ज्या आईच्या आणि महिलेच्या उदरातून जन्म घेतला तिच्याच नावाने शिवी देण्याचा प्रकार हा अत्यंत दुर्दैवी असून आई बहिणीवर शिवी देऊ नये यासाठी सोलापूर शहरात चक्क बॅनरबाजी करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , तंजीम हमदर्द ए इन्सानियत नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने यासाठी पुढाकार घेतलेला असून सोलापूर शहरात त्यासाठी बॅनर लावण्यात आलेले आहेत. ‘ जगात सर्वाधिक प्रिय अशी माझी आई आहे आणि इतर महिला देखील माझ्या आईसारख्याच आहेत ‘ या भावनेतून शिवीमुक्त कट्टा अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत कोणीही आई बहिणीवर एकमेकांना शिवी देऊ नये यासाठी जागृती उद्देशाने सोलापूर शहरात हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. संपूर्ण शहरात या बॅनरची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे