‘ बस किस्मतने साथ नही दिया साहब ‘ , सात जणांवर गुन्हा दाखल

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना बीड जिल्ह्यात समोर आलेली असून सतत धमक्या आणि खोट्या तक्रारीला कंटाळून अखेर एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कोपरा गावात ही घटना घडलेली असून आत्महत्या करण्याआधी सोशल मीडियावर स्टेटस ठेवत या तरुणाने आयुष्याचा शेवट केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , रामेश्वर महादेव डरपे असे या तरुणाचे नाव असून ‘ बस किस्मतने साथ नही दिया सहाब वरना दिल तो हमारा भी पागल था किसी के लिये ‘ असे व्हाट्सअपवर स्टेटस त्याने ठेवले आणि त्यानंतर गळफास घेतला. या प्रकरणात आत्तापर्यंत सात जणांच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रामेश्वर याच्या खिशात एक सुसाईड नोट देखील आढळून आलेली आहे.

सुसाईड नोटच्या आधारे बाळासाहेब उर्फ बालाजी अर्जुन ढगे राहणार टाकळगाव तालुका गेवराई ,संदिपान देविदास धोत्रे राहणार अंतरवली तालुका गेवराई , तानाजी सुरेश घोलप , सरस्वती सुरेश घोलप , सुरेश आसाराम घोलप ( सर्वजण राहणार तलवाडा ) आणि रामनाथ दाभाडे ( राहणार गेवराई ) आणि एक व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा