पुणे हादरलं..बाणेरमध्ये दाजीचा खून करून मेहुण्याने देखील त्यानंतर..

शेअर करा

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून कौटुंबिक कारणातून सातत्याने आपल्या बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीचा संतप्त झाल्यानंतर मेहुण्याने डोक्यात रॉड घालून खून केला आणि त्यानंतर स्वतः देखील त्याच खोलीत गळफास घेतलेला आहे. बाणेर परिसरातील श्री समृद्धी सोसायटी इथे मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीला आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , धनंजय पद्माकर साडेकर ( वय 38 ) असे मयत दाजीचे तर हेमंत रत्नाकर काजळे ( वय 40 ) असे मेहुण्याचे नाव आहे. धनंजय साडेकर हे एक हॉस्टेल चालवत होते तर हेमंत काजळे हा बेरोजगार होता. बहिणीचे लग्न झाल्यापासून दाजी असलेला धनंजय हा सातत्याने तिला त्रास देत असायचा आणि त्यातून बहीण अनेकदा भावाला फोन करायची त्यामुळे त्यांच्यात दोघांमध्ये अनेकदा वाद देखील झालेले होते.

मंगळवारी मेव्हणा काजळे याने दाजी धनंजय याला यासंदर्भात जाब विचारला त्यावेळी पुन्हा वाद झाला आणि काजळे याने साडेकर यांच्या डोक्यात गज मारला त्यात ते गंभीर जखमी झाले. आरोपी काजळे यांनी बहिणीला या घटनेची माहिती कळवली आणि त्यानंतर स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केलेले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता अशी माहिती पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे.


शेअर करा