‘ लग्न करू ‘ म्हणून बोलावलं अन काढली धिंड , चौघांवर गुन्हा दाखल

शेअर करा

देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून एका तरुणीने तिच्या प्रियकराला लग्नाच्या बहाण्याने बोलावलेले होते मात्र गावात आल्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी त्याला बेदम मारहाण केली आणि चपलांचा हार घालत त्याची गावभर धिंड देखील काढली. उत्तर प्रदेशातील बिजनोर येथील ही घटना आहे.

उपलब्ध माहितीनुसार , तरुण कुमार असे या तरुणाचे नाव असून 2 सप्टेंबर रोजी हारगाव येथील रहिवासी असलेली शालू सैनी हिने त्याला लग्नाबाबत बोलण्यासाठी त्याला आपल्या गावी बोलावले होते. तक्रारदार व्यक्ती तिथे पोहोचला त्यावेळी एका हॉटेल समोर शालू आणि तिच्या नातेवाईकांनी त्याला घेरले आणि जुन्या काही प्रकरणावरून मारहाण केली.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी इतक्यावरच न थांबता त्यांनी चक्क त्याच्या गळ्यात चपलांचा हार घातला आणि त्याचे कपडे देखील फाडून टाकले त्यानंतर संपूर्ण परिसरात त्याची धिंड काढण्यात आली. दरम्यानच्या काळात एका व्यक्तीने हा व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर व्हायरल करून दिला. पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपासाला सुरुवात केलेली आहे .


शेअर करा