मनोहर कुलकर्णी याच्या विरोधात पुण्यात फौजदारी तक्रार कोर्टात

शेअर करा

भारतीयांची आदरस्थाने असलेल्या व्यक्तींबद्दल सातत्याने वादग्रस्त विधाने करणारा मनोहर भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांच्या विरोधात शुक्रवारी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी दावा दाखल करण्यात आलेला आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी हा दावा दाखल केलेला असून 26 सप्टेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

उपलब्ध माहितीनुसार , 27 जुलै 2023 रोजी अमरावती येथील एका कार्यक्रमात मनोहर कुलकर्णी याने महात्मा गांधी आणि त्यांच्या परिवारातील स्त्रियांबद्दल तसेच महात्मा गांधी यांच्या वंशावळीबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचे वक्तव्य केलेले होते असा आरोप न्यायालयात करण्यात आलेला असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

सदर प्रकरणी तुषार गांधी , डॉक्टर कुमार सप्तर्षी , डॉक्टर विश्वंभर चौधरी , डॉक्टर मेघा सावंत , प्रशांत कोठडीया , संकेत मुनोत , जांबवंत मनोहर आणि युवराज शहा अशा नऊ जणांनी जनतेचे प्रतिनिधी म्हणून प्रख्यात वकील एडवोकेट असीम सरोदे , एडवोकेट श्रीया आवले ,एडवोकेट बाळकृष्ण निढाळकर यांच्यामार्फत खाजगी फौजदारी तक्रार पुण्यातील न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे.


शेअर करा