माझ्या मामाला राजकारणात ओव्हरटेक करतो का ? , आरपीआयच्या नेत्याला मारहाण

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार सोलापुरातील सांगोला इथे समोर आलेला असून माझ्या मामाला राजकारणात ओव्हरटेक करतो का ? असे म्हणत आरपीआयच्या माजी नगरसेवकाच्या भाच्याने आरपीआय आठवले गटाच्या तालुकाध्यक्षला मारहाण केलेली आहे. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना सांगोला येथील कचेरी रोडवर घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , खंडू महादेव सातपुते असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून या प्रकरणी किशोर उर्फ गोट्या झेंडे ( राहणार भीम नगर सांगोला ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. खंडू सातपुते यांचा 24 ऑगस्ट रोजी रामदास आठवले यांच्या सांगोला दौऱ्याच्या वेळी माजी नगरसेवक सुरज बनसोडे यांच्यासमवेत किरकोळ वाद झालेला होता.

2 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास खंडू सातपुते हे कचेरी रोडकडे येत असताना आरोपी त्याची बुलेट घेऊन त्यांच्या दुचाकी समोर आला आणि त्याने तू माझा मामा सुरज बनसोडे याला राजकारणात ओव्हरटेक करतो का ? असे म्हणत त्याच्या हातातील कातडी बेल्टने डाव्या हाताच्या खुब्यावर आणि पाठीवर मारहाण करत त्यांना जखमी केले. खंडू सातपुते यांनी माझी काही चूक नाही तू गैरसमज करून घेऊ नको असे सांगितले मात्र आरोपीवर त्याचा काही परिणाम झाला नाही तुझ्यामध्ये लय मस्ती आहे असे म्हणत शिवीगाळ करून तो तिथून निघून गेला असे म्हटलेले आहे .


शेअर करा