
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना कोल्हापूर जिल्ह्यात समोर आलेली असून सांगली कोल्हापूर महामार्गावरील इचलकरंजी फाटा धर्मनगर जवळ एका तृतीयपंथीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सतीश रामदास जावीर ( वय 34 वर्ष राहणार शिंदे मळा खोतवाडी तालुका हातकणंगले ) असे मयत तृतीयपंथीय व्यक्तीचे नाव असून 24 तारखेला नेहमीप्रमाणे तो इचलकरंजी फाट्यावर गेलेला होता त्यानंतर शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आलेला होता.
घटनास्थळी जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे यांनी पथकासह धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिलेला आहे . गुन्ह्यामागचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.