सततच्या ब्लॅकमेलला वैतागून अखेर शिक्षकाचे टोकाचे पाऊल

शेअर करा

महाराष्ट्रात एक दुर्दैवी अशी घटना बीड जिल्ह्यात समोर आलेली असून सातत्याने पैशासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तींना वैतागून अखेर एका शिक्षकाने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवलेली आहे . बुधवारी सकाळी ही घटना घडलेली असून सुसाईड नोटमध्ये त्यांनी पैशासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तींची नावे लिहून ठेवलेली आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , अंकुश रामभाऊ पवार ( वय 33 राहणार अंथरवण पिंपरी हल्ली मुक्काम उत्तम नगर बीड ) असे मयत शिक्षक यांचे नाव असून एका आश्रमशाळेवर शिक्षक म्हणून ते काम करत होते. बीड येथील अमित अनवणे , कोमल अनवणे , कोमलचे भाऊ दत्ता गायकवाड , आकाश गायकवाड आणि त्यांची आई यांनी त्यांना दहा लाख रुपये देण्यासाठी त्रास देण्यास सुरू केलेले होते. अंकुश यांनी त्यांना पाच लाख रुपये आधी दिलेले देखील होते मात्र तरी देखील आरोपींकडून पैशाचा तगादा सुरू होता.

सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपण अगोदर कोमल हिला पाच लाख रुपये दिले देखील आहेत असे सांगत आरोपींच्या त्रासाला वैतागून आपण आत्महत्या करत आहोत असे म्हटलेले होते. अंकुश पवार हे बुधवारी सकाळी आश्रमशाळेत गेलेले होते तिथे शिक्षकांसह मुलांना ते भेटले आणि त्यानंतर शाळेत चिठ्ठी लिहून त्यांनी परिसरातील एका डोंगरावर जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.


शेअर करा