देव तारी त्याला..सावत्र बापानं पुलावरून सर्वांना ढकललं पण..

शेअर करा

देशात एक संतापजनक अशी घटना आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात समोर आलेली असून सावत्र बापाने पत्नी आणि दोन मुलींना गोदावरी नदीत ढकलून दिले त्यात पत्नी आणि एक मुलगी नदीत वाहून गेल्या त्या अद्यापपर्यंत आढळून आल्या नाहीत मात्र एक एक मुलगी फेकून दिल्यानंतर पाईपवर लटकली आणि कसेबसे करत तिने खिशातून फोन काढून शंभर नंबरवर फोन केला त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तिची सुखरूप सुटका केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सहा ऑगस्ट रोजी पहाटे चारच्या सुमारास सुरेश नावाच्या एका व्यक्तीने त्याची पत्नी सुहासी ( वय 36 ) मुलगी कीर्तना ( वय तेरा ) आणि मुलगी जर्सी ( वय एक ) यांना गोदावरी नदीच्या पुलावरून ढकलून दिलेले होते. त्यात पत्नी आणि एक वर्षांची मुलगी वाहून गेल्या मात्र कीर्तना ही पुलावरील एका पाईपला लटकून बसलेली होती. कसेबसे करत तिने खिशातून फोन काढला आणि पोलिसांना फोन केला . पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि या मुलीची अखेर सुटका केलेली आहे.

मुलीने दिलेल्या माहितीनुसार , आईसोबत राहणारा सावत्र बाप सुरेश याने हा राजमुद्री इथे आपल्याला घेऊन गेला आणि त्यानंतर पुलावर सेल्फी घेण्याच्या बहाण्याने आम्हाला तिघांनाही ढकलून दिलेले होते. पोलिसांनी तात्काळ दोन पथके तयार केली आणि ढकलून दिलेल्या आईचा आणि तिच्या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केलेली आहे तर आरोपीचा देखील शोध सुरू असल्याची माहिती आहे.


शेअर करा