
सोशल मीडियावर सध्या एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून हे प्रकरण अमेरिका येथील आहे . सदर प्रकरणातील जोडप्याच्या वयामध्ये तब्बल 42 वर्षांचे अंतर असून या तरुणीचा प्रियकर हा सत्तर वर्षांचा आहे तर तरुणीचे वय 28 वर्षे आहे . एका यूट्यूब चैनलने त्यांची मुलाखत घेतलेली असून त्यांच्यावर ‘ तुमचे प्रेम खोटे आहे पैशासाठी तू म्हाताऱ्याशी लग्न केलेले आहे ‘ अशी टीका त्यांच्यावर केली जात आहे .
उपलब्ध माहितीनुसार, डेविड ( वय सत्तर ) असे या प्रियकराचे नाव असून सात वर्षांपूर्वी तो फिलिपिन्समध्ये प्रवास करत होता त्यावेळी एका डेटिंग वेबसाईटवर त्याची जॅकी ( वय 28 ) नावाच्या एका तरुणीसोबत मैत्री झालेली होती त्यानंतर ते दोघे अनेकदा डेटवर गेले आणि त्यानंतर प्रेमात पडले. तीन महिन्यांनी तो पुन्हा फिलिपिन्सला गेला आणि त्याने तिला लग्नाची मागणी घातली त्यानंतर जॅकी आकलँडला शिफ्ट झालेली आहे.
त्यांच्या वयातील अंतर हाच सध्या चर्चेचा विषय झालेला असून लग्नानंतर जॅकी हिला सोशल मीडियावर तू म्हाताऱ्या व्यक्तीशी केवळ पैशासाठी लग्न केलेले आहेस अशी टीका केली जात होती तर तिचा प्रियकर यांनी देखील ‘ मी तिला अनेकदा आपल्या वयातील अंतराविषयी माहिती दिली मात्र तिने एकमेकांमधील प्रेम खरे असेल तर वय ही फक्त एक संख्या आहे ‘ असे म्हटलेले होते. डेव्हिड सध्या निवृत्त झालेले असून जॅकी एका ठिकाणी काम करते.