
पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून अशीच एक घटना पुन्हा एकदा पुण्यात समोर आलेली आहे . घरगुती वादातून संतापलेल्या पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार बुधवारी भवानी पेठेत उघडकीला आलेला आहे.
भवानी पेठेतील मंजुळाबाई चाळ परिसरात ही घटना घडलेली असून पत्नीला चक्कर आली आणि पडून तिचा मृत्यू झाला असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता मात्र तपासादरम्यान हे बिंग फुटलेले असून याप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी सहा तारखेला बेड्या ठोकलेल्या आहेत.
शफिक सुकरला चौधरी ( वय 34 राहणार भवानी पेठ ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याची पत्नी नुरजहा ( वय 28 ) हिचा या घटनेत मृत्यू झालेला आहे . त्यांच्यामध्ये मंगळवारी पाच तारखेला सकाळी जोरदार भांडण झालेले होते त्यावेळी आरोपीने तिचा गळा आवळला आणि ती बेशुद्ध झाल्यानंतर तिला चक्कर आली असे सांगत रुग्णालयात घेऊन आलेला होता मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता. रुग्णालय प्रशासनाकडून या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली त्यावेळी पोलीस दाखल झाले त्यावेळी कसून चौकशी करताना हा प्रकार समोर आलेला आहे