पुण्यात ढोलताशा पथकात गेलेल्या मुलाचे अपहरण आणि खून

शेअर करा

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून ढोल ताशा पथकात सरावासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आलेला आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरात ही घटना घडलेली असून सुमारे चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे आरोपींमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अनुप अमोल पायाळ (वय सोळा वर्ष राहणार भाग्योदय नगर कोंढवा ) असे मयत मुलाचे नाव असून याप्रकरणी साईराज राणा प्रताप लोणकर ( वय 25) आणि ओंकार आप्पा कापरे ( वय 25 दोघेही राहणार कोंडवा ) अशी आरोपींची नावे असून दोन अल्पवयीन मुलांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झालेली आहेत. आरोपी लोणकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून याआधी देखील त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.

अनुप हा शनिवारी ढोल ताशा पथकात सरावासाठी गेलेला होता मात्र त्यानंतर तो पुन्हा आला नाही म्हणून त्याच्या कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार कोंढवा पोलीस ठाण्यात दिली. अल्पवयीन असल्याकारणाने तात्काळ पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली अनुप सोबत गेलेला आणखीन एक मुलगा देखील गायब होता मात्र तो घरी परतला त्यावेळी त्याच्या अंगावर जखमा आढळून आल्या.

पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली त्यावेळी त्याने स्थानिक वर्चस्वाच्या वादातून कोंढवा परिसरात दोन गटांमध्ये वैमनस्य आहे त्यामुळे प्रतिस्पर्धी गटातील टोळक्याने अनुप याचे अपहरण केले आणि त्याला सासवड परिसरात नेलेले होते अशी माहिती समोर आली. तिथे त्याला आरोपींनी बेदम मारहाण केली आणि त्याचा मृत्यू झाला. कोंडव्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.


शेअर करा