‘ कीर्तीरूपे उरावे ‘, जखमी पोलीस हवालदार जाताना असे काही करून गेले की..

शेअर करा

एखादा माणूस मृत्यूच्या दारात असताना कुणासाठी काही करू शकत नाही हा समज खोटा ठरवणारी एक घटना नागपूर इथे समोर आलेली असून एका दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आपले अवयव दान करून तीन जणांना नवीन जीवनदान दिलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, किशोर तिजारे असे पोलीस हवालदार असे या पोलीस हवालदारांचे नाव असून ते नागपूर शहरातील काटोल रोडच्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होते . 8 ऑगस्ट रोजी गिट्टी खदान परिसरात ड्युटीवर असताना त्यांचा भीषण अपघात झाला आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातात त्यांचा ब्रेन डेड झाल्यानंतर कुटुंबाने अखेर अवयवदानाचा निर्णय घेतला.

त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरू होते मात्र अखेर डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड झालेला आहे असे घोषित केले . कुटुंबीयांना बोलावून घेतले त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना तुम्हाला अवयवदान करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता असे देखील सांगितले होते. कुटुंबाने त्यानंतर तात्काळ अवयवदानाचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांची एक किडनी 47 वर्षीय पुरुष रुग्णाला देण्यात आली तर दुसरी किडनी तीस वर्षीय तरुणाला देण्यात आलेली आहे आणि त्यांचे कार्निया हे एका संस्थेला दान करण्यात आलेले आहे. तिजारे यांच्या कुटुंबीयांच्या माणुसकीचे परिसरात कौतुक केले जात आहे.


शेअर करा