
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार समोर येत असून अशीच एक घटना पिंपरीत समोर आलेली आहे. फेसबुक आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून एका महिलेला आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवण्यात आले आणि त्यानंतर एक पार्सल फॉरेस्ट विभागाने पकडलेले आहे असे सांगत सुमारे 16 लाख 62 हजार रुपयांची महिलेची फसवणूक करण्यात आली.
उपलब्ध माहितीनुसार, सात जानेवारीपासून तर 18 जानेवारीपर्यंत ही घटना मोशी परिसरात घडलेली असून पीडित महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. महिलेशी संपर्क साधणाऱ्या केलविन पेट्रीक नावाच्या एका महिलेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
संशयित असलेली केलवीन हिने तक्रारदार महिला सोबत फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधला आणि त्यानंतर व्हाट्सअप वर संपर्क करत आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवलेले होते . फिर्यादी महिलेने मी तुमच्यासाठी एक पार्सल पाठवत आहे असे देखील तिने सांगितले होते.
फोन करणाऱ्या महिलेने त्यावेळी आपण दिल्ली इथून फॉरेस्ट डिपार्टमेंटमधून बोलत आहोत असे सांगत तुम्हाला जे पार्सल पाठवण्यात आलेले आहे ते पकडण्यात आलेले आहे असे सांगत वेळोवेळी महिलेकडून सुमारे 16 लाख 62 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करून घेतले. आपली फसवणूक झालेली जाणीव होताच महिलेने पोलिसात धाव घेतलेली आहे.