तीन तलाक अन हलालाची चीड म्हणून धर्मांतर करून लग्न , प्रियकर तुरुंगातही गेला पण..

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका विवाहाची जोरदार चर्चा सुरू असून उत्तर प्रदेशातील बरेली येथील हे प्रकरण आहे. बरेलीमध्ये आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर प्रेमप्रकरणात या तरुणाला पाच वर्ष तुरुंगात जावा लागले मात्र तरी देखील त्याने त्याच्या प्रेयसीसोबत लग्न केलेले असून तरुणाचे नाव आकाश तर तरुणीचे नाव इकरा असे आहे . इकरा हिने एका धार्मिक सोहळ्यात तिने धर्मांतर केले आणि त्यानंतर आकाश याच्यासोबत विवाह केला.

उपलब्ध माहितीनुसार , रामपूर येथील रहिवासी असलेला आकाश आणि सिरोली इथे राहणारी इकरा यांचे पाच वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. आकाश इयत्ता नववी पास असून त्याचे प्रयसी ही पाचवी शिकलेली आहे. क्रिकेट मॅच खेळण्यासाठी आकाश जाता असायचा याच दरम्यान त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरू झाले.

काही वर्षे उलटल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 2021 मध्ये ते घरातून पळून गेले मात्र दोघेही अल्पवयीन असल्याकारणाने इकरा हिच्या घरच्यांनी आकाशाच्या विरोधात पोलिसात फिर्याद नोंदवली आणि आकाश याला तुरुंगात पाठवण्यात आले तर इकरा हिने कुटुंबीयांसोबत जाण्यास नकार दिल्याने आर्य समाजाच्या अनाथ आश्रमात तिची रवानगी करण्यात आलेली होती.

काही दिवसानंतर आकाशाला जामीन मिळाला आणि त्यानंतर तो घरी गेल्यानंतर त्याची प्रेयसी इकरा ही देखील त्याच्या घरी गेली. काही दिवस सोबत राहिल्यानंतर कायद्याने ते सज्ञान झाले त्यावेळी त्यांनी पुन्हा एका आश्रमात जाऊन एक इकरा हिचे धर्म परिवर्तन केले आणि त्यानंतर लग्नविधी पार पडले. इकरा हिने हिंदू धर्म स्वीकारून स्वतःचे नाव प्रीती असे ठेवलेले आहे. आपल्याला तीन तलाक आणि हलाला या प्रथांची चीड होती त्यामुळे आपण धर्मांतर केले असे देखील तिने सांगितलेले आहे.


शेअर करा