एकाच वेळी सात जणींशी लग्न , दोघी सख्ख्या बहिणी

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीची जोरदार चर्चा असून युगांडा येथील हे प्रकरण आहे. युगांडा येथील एका व्यक्तीने एकाच वेळी एकाच मंडपात तब्बल सात तरुणांशी विवाह करून अनोखा विक्रम नोंदवलेला असून यातील दोन तरुणी चक्क सख्या बहिणी आहेत.

हबीब आन्सीसोन असे या उद्योजकाचे नाव असून त्याचे वय 43 वर्षे आहे. आर्थिक दृष्ट्या तो चांगलाच सधन असून एक ट्रॅडिशनल हिलर अर्थात पारंपारिक औषधे देणारा जडीबुटीवाला देखील आहे. लोकांचे आजार तो दूर करतो अशी त्याची ख्याती असून त्यातून त्याने प्रचंड पैसा कमावलेला आहे

हबीब याचा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर त्याने एक आलिशान रिसेप्शन पार्टी आयोजित केलेली होती या पार्टीवर त्याने पैशाची इतकी उधळपट्टी केली की ती उधळपट्टी हाच चर्चेचा विषय ठरला. सात बायकांना त्याने प्रत्येकी एक नवीन कार भेट दिलेली आहे .


शेअर करा