कामावरून घरी जात असतानाच ‘ नको ते ‘ घडलं , पुण्यातील घटना

शेअर करा

पुण्यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना समोर आलेली असून पिंपरी चिंचवड पुणे शाखेच्या दरोडा विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार राजेश कौशल्य यांचे अपघाती निधन झालेले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ऑगस्टरोजी खंडेवस्ती इथे त्यांचा अपघात झालेला होता त्यानंतर 14 तारखेला अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे. आपले कर्तव्य बजावून घरी जात असताना ही घटना घडलेली होती.

उपलब्ध माहितीनुसार , राजेश कौशल्ये 2009 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेले होते सुरुवातीला त्यांनी नांदेड इथे काही काळ काम केले आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात ते रुजू झालेले होते. दोन ऑगस्ट रोजी त्यांच्या दुचाकीवरून घरी जात असताना मोशी इथे त्यांच्या दुचाकीला एक कुत्रा आडवा आला याच दरम्यान त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. अपघातात हेल्मेट डोक्यावरून निघाल्याने डोक्याला देखील गंभीर इजा झालेली होती.

रात्री दीड वाजताची वेळ होती त्यामुळे रस्त्याने रस्त्याने मदत करण्यासाठी कोणी आले नाही . पंधरा ते वीस मिनिटांनी एका पीएमपी बस चालकाच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तात्काळ एमआयडीसी भोसरी पोलिसांना या प्रकरणी माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलेले होते मात्र त्यानंतर त्यांची अखेर प्राणज्योत मालवलेली असून एक कर्तव्यनिष्ठ पोलीस म्हणून त्यांची प्रतिमा होती . दरोडा विरोधी पथकाने पुण्यातील अनेक ठिकाणी कारवाई करत घरफोडीचे गुन्हे उघडकीला आणलेले होते. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्यावर शोककळा पसरलेली आहे .


शेअर करा