युक्रेनच्या सैन्याशी भिडणार आता नेपाळी तरुण , नियमात केले बदल अन..

शेअर करा

मनमानी पद्धतीने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अवघ्या काही दिवसात युक्रेन आपल्या ताब्यात येईल अशी पुतीन यांची अपेक्षा होती मात्र युक्रेनच्या जनतेने त्यांचे मनसुबे उधळून लावलेले असून अद्यापपर्यंत देखील रशियन सैन्य युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी झगडत आहे असे असताना वॅग्नर बंड पुन्हा झाले आणि रशियन सैन्याची जागतिक पातळीवर नाचक्की झाली मात्र हे बंड शमले.

ताज्या आलेल्या वृत्तानुसार रशियातील लष्करामध्ये आता सध्या चक्क नेपाळी तरुणांची सैनिक म्हणून भरती करण्यात आल्याचे समोर आलेले आहे . एका सैनिकाने याप्रकरणी माध्यमांना माहिती दिलेली असून नेपाळमधून उच्च शिक्षणासाठी म्हणून तो रशियाला आलेला होता मात्र नेपाळमध्ये गेल्यावरही आपल्याला चांगली नोकरी मिळेल याची काही ग्यारंटी नव्हती याच दरम्यान रशिया युक्रेन युद्धात काही रशियन सैनिक मरण पावले आणि रशियाने यानंतर विदेशी युवकांची भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नियमात बदल करण्यात आलेले असून नेपाळच्या शेकडो युवकांना आता रशियाच्या सैन्यात भरती करून घेण्यात येणार आहे.

रशिया युक्रेन युद्धात मोठ्या प्रमाणात धोबीपछाड होत असल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी सैन्यबळ वाढवण्याच्या उद्देशाने नियमात बदल करून सैन्य भरतीचे नियम आणखीन सोपे केलेले आहेत त्यामुळे आधीच आर्थिक गर्तेत सापडलेल्या नेपाळी युवकांपुढे ही सुवर्णसंधी चालून आलेली आहे. आपल्या विरोधात झालेल्या बंडाला पुतीन यांनी गद्दार म्हटलेले असून भाषणाच्या दरम्यान पुतीन हे थकलेले दिसून आलेले होते.


शेअर करा