
सोशल मीडियावर सध्या चीन येथील एका बिल्डिंगची जोरदार चर्चा सुरू असून चीनचा एक नवीन कारनामा पुन्हा एकदा समोर आलेला आहे. चीनच्या तंत्रज्ञांनी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पेट्रोल पंप उभारलेला असून विशेष म्हणजे या पंपावर पेट्रोल भरणाऱ्यांची देखील रोज गर्दी होत आहे आणि त्यामागील कारण देखील तितकेच वेगळे आहे.
चीनच्या चोंगकिंग नावाच्या शहरात हा पेट्रोल पंप उभारण्यात आलेला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. अनेक youtube चैनल वर देखील हा व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आलेला असून आता पाचव्या मजल्यावर पेट्रोल टाकायला कोण आणि कसे जाणार ? हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर त्याचे देखील उत्तर चीनकडे तयार आहे.
चीनच्या कल्पकतेचा हा एक अप्रतिम नमुना असून मुख्य म्हणजे ही पाच मजली इमारत मुख्य रस्त्यापासून खूप खाली आहे त्यामुळे इमारतीचा पाचवा मजला आणि रस्ता समांतर पातळीवर येत असल्याने रस्त्यावरून जाणारी वाहने या पंपावर थांबून वाहनात पेट्रोल टाकतात आणि त्यानंतर पुन्हा रस्त्यावर येऊन आपल्या इच्छित स्थळी रवाना होतात. पेट्रोल पंपाच्या खाली चार मजले असून चीनच्या या अद्भुत कारनाम्याची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे.