पुण्यातील आयएएस अधिकारी अनिल रामोड निलंबित , घरात सापडले होते सहा कोटी

शेअर करा

संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालय येथील लाचखोर आयएएस अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड याला अखेर सेवेतून निलंबित करण्यात आलेले आहे. अटक करण्यात आल्यानंतर 48 तास तो कोठडीत असल्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्याला निलंबित केल्याचे आदेश बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालय यांना प्राप्त झालेले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरणात आठ लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने अनिल याला रंगेहाथ पकडलेले होते. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून त्याच्याकडून सुमारे सव्वा लाखांची रोकड आणि घरात तब्बल सहा कोटी रुपये जप्त करण्यात आलेले होते. काही सरकारी महत्त्वाची कागदपत्रे देखील त्याच्या घरीच आढळून आलेले असून त्याने बायकोच्या नावावर देखील 47 लाख रुपये जमा करून घेतलेले होते.

निलंबनाच्या आदेशामध्ये त्याने मुख्यालय पुणे मुख्यालय सोडून जाऊ नये असे देखील नमूद केलेले असून कोणतेही खाजगी नोकरी देखील करण्यास अटकाव करण्यात आलेला आहे सोबतच पुण्याबाहेर जायचे असेल तर विभागीय आयुक्त यांची परवानगी घेऊनच जावे असे देखील त्यात म्हटलेले असून त्याच्यावर झालेल्या या कारवाईनंतर शासकीय अधिकारी लाचखोरीला किती सोकावलेले आहेत हे देखील समोर आलेले आहे.


शेअर करा