पुणे हादरलं..गुप्तांग कापलेल्या अवस्थेत विहिरीत तरुणाचा मृतदेह

शेअर करा

पुणे हादरलं

गेल्या काही वर्षांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडमध्ये असाच एक खळबळजनक प्रकार समोर आलेला आहे. दारू पिताना मित्रांनी शिवीगाळ केली म्हणून वाद झाल्यानंतर संतापलेल्या एका तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राची हत्या केली सोबतच त्याचे लिंग देखील कापून टाकले.

उपलब्ध माहितीनुसार , गणेश भगवान रोकडे असे मयत तरुणाचे नाव असून चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी अभिषेक उर्फ डल्या गायकवाड याला अटक केलेली आहे. हत्या झालेला गणेश आणि आरोपी अभिषेक याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगा असे तीन जण मित्र रेल्वे चिंचवड रेल्वे स्थानकाच्या परिसरातील मैदानात दारू पीत बसलेले होते. गणेश आणि अभिषेक यांच्यामध्ये वाद झाला म्हणून गणेशने त्याला शिवीगाळ केली.

गणेश याने शिवीगाळ केल्यानंतर अभिषेक संतापला आणि त्याने गणेश आणि त्याच्यासोबत असलेला अल्पवयीन मुलगा यांच्यावर ब्लेडने वार केले त्यात गणेश याचा रक्तबंबाळ होऊन मृत्यू झाला. आरोपीने गणेश याचे गुप्तांग कापले आणि त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. बुधवारी घटना घडली होती मात्र शनिवारी प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी अभिषेक याला अटक केलेली आहे तर त्याच्यासोबतच्या अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे.


शेअर करा