
पाकिस्तानची सीमा हैदर भारतात आल्यानंतर सोशल मीडियावरती चांगलीच चर्चेत असून आपल्या चार मुलांसोबत तिने तिचा प्रियकर सचिन मीना याच्यासाठी पाकिस्तान सोडून भारत गाठला होता . सद्य परिस्थितीत तिची एटीएसकडून चौकशी चालू असून तिला भारतीय नागरिकत्व देण्यात येईल की नाही याविषयी देखील जोरदार चर्चा आहे. तिच्या आणि सचिनच्या प्रेमावर ‘ कराची टू नोएडा ‘ नावाचा एक चित्रपट फायरफॉक्स एंटरटेनमेंट बनवणार असून मनसेने याविषयी संताप व्यक्त केलेला आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक अमित जानी यास मनसेकडून इशारा देखील देण्यात आलेला होता त्यावर अमित जानी यांनी देखील मनसेला आव्हान दिलेले आहे.
मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतेही स्थान असता कामा नये या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत . सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला भारतात आहे . ती आयएसआय एजंट आहे अशा देखील बातम्या पसरलेल्या होत्या. आमच्या इंडस्ट्री मधील काही उपटसुंभ व्यक्ती प्रसिद्धीसाठी त्या सीमा हैदरला अभिनेत्री बनवत आहेत . देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत. हे असले तमाशे ताबडतोब बंद करा नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार राहा ‘ असे त्यांनी म्हटलेले होते.
अमित जानी यांनी देखील त्यावर पलटवार करत , ‘ अमित जानी 19 तारखेला मुंबईत येणार . तुम्ही अमित जानीला थांबू शकत नाही . उत्तर प्रदेश बिहारचे प्रोडक्शन हाऊस या चित्रपटाची निर्मिती करत असल्याने मनसेला वाईट वाटलेले आहे. आम्ही मुंबईत येणार आणि तिथेच चित्रपटाचे शूटिंग करणार आणि सर्व चित्रपटाची तयारी मुंबईतच करणार आहे. तुम्हाला जो राडा करणार त्याला आम्ही ज्यांनी घाबरत नाही ‘, असे म्हणत आपली भूमिका मांडली आहे.