सनातन धर्माची तुलना चक्क डेंगू आणि मलेरियासोबत

शेअर करा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री असलेले एम के स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन याने शनिवारी एक वादग्रस्त वक्तव्य केलेले असून सनातन धर्माची तुलना चक्क डेंगू आणि मलेरियासोबत केलेली आहे . उदयनिधी म्हणाला की सनातन धर्माचा फक्त विरोध केला नाही पाहिजे तर त्याची सफाई केली पाहिजे. एका संमेलनात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे .

उदयनिधी याने या कार्यक्रमात बोलताना म्हणाला की , ‘ सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समाजाच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध केला जाऊ शकत नाही तर त्यांना संपवायलाच हवं. आपण डेंगू डास मलेरिया कोरोनाचा विरोध करू शकत नाही मात्र आपल्याला हे संपवावे लागेल . सनातन नाव संस्कृतमधून आहे हे सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे .’

भाजपकडून यानंतर उदयनिधी याच्यावर टीका करण्यात आली त्याला उत्तर देताना , ‘ मी कधीच सनातन धर्माच्या अनुयायांच्या नरसंहाराचे आवाहन केलेले नाही . मी माझ्या शब्दावर कायम आहे आणि सनातन धर्मामुळे पीडित असलेल्यांच्या बाजूने मी बोलत आहे. कोणत्याही कायदेशीर आव्हानाचा सामना करण्यास देखील मी तयार आहे , ‘ असे म्हटलेले आहे.


शेअर करा