
गेल्या काही वर्षांपासून इंटरनेट डाटा स्वस्त झाला असल्याकारणाने युट्युब वापरणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटमध्ये देखील पैसे अडकवण्यासाठी कोणता शेअर घ्यायचा आणि नक्की सुरुवात कशी करायची हे अनेक जणांना समजत नाही म्हणून त्यांना गायडन्स करण्यासाठी म्हणून अनेक युट्युब चॅनेल सुरू झालेले आहेत. युट्युबच्या माध्यमातून काही स्वरूपात हे चॅनल पैसे कमवतात तर काही जणांना या कमाईमध्ये भलतेच मार्ग सापडले असल्याकारणाने नागरिकांची देखील अनेकदा फसवणूक होत आहे.
युट्युबवर असलेले ज्ञान मोफत मिळत असल्याकारणाने अनेक जण यांचे चॅनल सबस्क्राईब करतात आणि त्यानंतर या चैनलवरील अनेक महारथी नागरिकांना शेअर मार्केट गुंतवणुकीच्या टिप्स देतात. त्यांना फायनान्शिअल इन्फ्ल्यूएनसर असे देखील म्हटले जाते मात्र अनेकदा सल्ला देणाऱ्या व्यक्तीचे शिक्षण काय आहे ? त्याचा अनुभव किती आहे ? याबद्दल देखील गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना माहिती नसते त्यामुळे त्यांची फसवणूक होण्याची देखील दाट शक्यता असते .
शेअर मार्केटमध्ये फसवणूक झाल्यानंतर अनेक जणांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर सेबी आता अशा व्यक्तींवर फायनान्शियल इन्फ्ल्यूएनसर व्यक्तींवर कठोर नियंत्रण करण्याची तयारी सुरू करत आहे. अनेकदा या व्यक्ती एखाद्या कंपनीकडून पैसे घेतात आणि त्यानंतर त्या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला देतात त्यामुळे देखील नागरिकांचा संभ्रम होतो आणि त्याच्यात फसवणूक होण्याची देखील शक्यता असते.
अनेक फायनान्शिअल इन्फ्ल्यूएनसर सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यासाठी काही लाखांची रक्कम घेत असून सेबी आता अशा पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्याच्या तयारीत आहे. फायनान्शियल इन्फ्ल्यूएनसर असणाऱ्या व्यक्तींना आता सेबीकडे स्वतःची नोंदणी करावी लागेल सोबतच मार्गदर्शक तत्त्वांचे देखील पालन करावे लागेल. म्युच्युअल फंड आणि शेअर ब्रोकर सोबतच्या भागीदारीवर देखील बंदी घालण्याचाही प्रस्ताव असून अनियंत्रित पद्धतीने नागरिकांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींच्या कार्यशैलीमुळे अनेकदा नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.