गॅस परवडेना म्हणून चुलीसाठी लाकडे आणायला गेली अन..

शेअर करा

महाग झालेला गॅस आता परवडत नसल्याने अनेक ग्रामीण पातळीवर अनेक कुटुंबांनी चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केलेली असून त्यासाठी जंगलातून लाकडे गोळा करून गुजराण शेतकरी बांधव करत आहेत पावसाळ्याचे दिवस असल्याने अशीच एक दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समोर आलेले असून सरपण गोळा करत असताना विंचू चावल्याने तीस वर्षीय महिलेने अखेर प्राण गमावलेले आहेत. पाच ऑगस्ट रोजी ही घटना दुपारी तीनच्या सुमारास तुळजापूर पैठण येथे घडलेली होती.

उपलब्ध माहितीनुसार , भाग्यश्री राजू बनगैय्या असे मयत महिलेचे नाव असून भाग्यश्री यांचा विवाह काही वर्षांपूर्वी राजू यांच्यासोबत झालेला होता. राजू आणि भाग्यश्री यांच्यात पटत नसल्याकारणाने भाग्यश्री अखेर संतापून मुलींसोबत माहेरी येऊन राहू लागल्या होत्या. माहेरी राहून गावात मिळेल ते काम करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असायच्या.

घटना घडली त्यादिवशी त्या आई , भाऊजयी मुलगी आणि मुलगी यांच्यासोबत खुरपणी कामासाठी गेलेल्या होत्या त्यावेळी भाग्यश्री यांची मुलगी चूल पेटवण्यासाठी सरपण जमा करत होती. मुलगी सरपंच गोळा करत असताना भाग्यश्री तिला मदत करण्यासाठी गेल्या त्यावेळी त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला विंचू चावला. प्रथम उपचारासाठी त्यांना पैठण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि त्यानंतर घाटी रुग्णालयात अखेर त्यांनी प्राण गमावलेले आहेत. पैठण पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.


शेअर करा