साहेब बायकोला आवरा ती पाकिस्तानला जाईल , पतीची पोलिसात धाव

शेअर करा

सोशल मीडियावर पुन्हा एकदा एका प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झालेली असून पंजाबच्या अमृतसरमधील हे प्रकरण आहे. गुरु रामदास नगर येथील रहिवासी असलेले जगदीप सिंह यांनी पोलीस ठाण्यात दाखल होत त्यांची पत्नी फेसबुकवर एका पाकिस्तानी व्यक्तीच्या प्रेमात वेडी झालेली असून ती कधीही पाकिस्तानात जाऊ शकते असे सांगत आपली तक्रार नोंदवलेली आहे. तिला तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा ती पाकिस्तानला जाऊ शकते असे देखील या व्यक्तीचे म्हणणे आहे.

उपलब्ध माहितीनुसार , जगदीप असे या पतीचे नाव असून 2007 मध्ये त्यांचे कुलविंदर कौर नावाच्या तरुणीसोबत लग्न झालेले होते. सध्या त्यांना तीन मुले असून एक महिन्यापूर्वी त्यांच्या पत्नीची पाकिस्तानमधील एका व्यक्तीशी ओळख झालेली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर ती सातत्याने त्याच्या संपर्कात राहत होती हे आपल्या लक्षात आल्यानंतर आपण तिला जाब विचारला त्यावेळी तिने तो पाकिस्तानचा नाही तर इंग्लंडचा आहे , असे आपल्यासोबत ती खोटे बोललेले आहे.

सद्य परिस्थितीत आपली पत्नी इतकी प्रेमात आंधळी झालेली आहे किती मुलांना सांभाळत नाही सोबतच कुटुंबाची देखील कुठलीच काळजी करत नाही . पत्नीचा मित्र तिला सगळे काही सोडून त्याच्याकडे येण्यास प्रवृत्त करत आहे. जर ती तिकडे गेली तर पोलीस मला त्रास देतील आणि माझे कुटुंब उध्वस्त होईल असे देखील त्याने म्हटलेले असून त्याच्या पत्नीने मात्र तो आपला प्रियकर नाही तर आपण त्याला भाऊ मानते म्हणून आपण सुखदुःख त्याच्यासोबत शेअर करते असे म्हटलेले आहे. पोलिसांनी अद्यापपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही मात्र या दांपत्यावर पोलीस लक्ष ठेवून आहेत.


शेअर करा