वहिनी या आपण भांडण मिटवू , महिला विश्वास ठेवून गेली पण त्यानंतर..

शेअर करा

देशात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या उत्तर प्रदेशात समोर आलेले असून एका दिराने त्याच्या वहिनीला भांडण मिटवण्यासाठी म्हणून घरी बोलावले होते . दिरावर विश्वास ठेवून ही वहिनी तिथे पोहोचली मात्र तिथे गेल्यानंतर दीर मोठा दीर आणि एका नातेवाईकाने विश्वासघात करत तिच्यावर अत्याचार केलेला आहे . पोलिसात जाऊ नये म्हणून देखील तिला धमकी देण्यात आली मात्र तिने अखेर पोलिसात धाव घेतलेली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील ही घटना आहे.

सदर प्रकरणी पोलिसांनी आठ लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात केली मात्र सर्व आरोपी सध्या फरार आहेत. बरेली येथील बारादरी भागात राहणाऱ्या पीडित महिलेचा तिच्या पतीसोबत दहा महिन्यांपासून वाद सुरू होता. अनेकदा त्यांच्यात भांडण देखील झालेले होते आणि कौटुंबिक कलह सातत्याने वाढतच होता.

महिलेचा दिर असलेला मुन्ना याने तिला फोन केला त्यावेळी ही महिला पतीसोबत भांडण करून माहेरी निघून गेलेली होती. काही वेळाने महिलेचा मोठा दीर आणि इतर नातेवाईक हे देखील मुन्ना यांच्या घरी पोहोचले आणि त्यानंतर महिलेला बोलावण्यात आले. सर्वजणांनी जबरदस्तीने या महिलेला घरात रोखले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला असा आरोप महिलेचा असून कसाबसा महिलेने तिथून पाय काढला आणि पोलिसात धाव घेतली. सदर प्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत.


शेअर करा