सरकारी अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी ‘ भीक ‘ मागण्यास केली सुरुवात

शेअर करा

देशात एक अजब असा प्रकार समोर आलेला असून बिहारमधील बेगूसराय इथे चक्क सरकारी अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी म्हणून भीक मागण्याचा प्रकार समोर आलेला आहे. निवृत्त झालेल्या व्यक्तीजवळ अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी पैसे नव्हते म्हणून त्यांनी भीक मागण्यास सुरुवात केली. निवृत्त कर्मचारी मोहन पास्वान यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , मोहन पास्वान असे या निवृत्त झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते बेगूसराय येथील सर्व शिक्षा अभियान कार्यालयाजवळील हाऊस रस्ता परिसरातील रहिवासी आहेत. आपल्याला आपला न्याय हक्क मिळवण्यासाठी लाच मागितली जात आहे मात्र त्याची रक्कम जास्त आहे आणि आपण ती देऊ शकत नाही म्हणून त्यांनी भीक मागण्यास सुरुवात केलेली आहे. भिक मागून जमा झालेले पैसे लाच स्वरूपात देऊन अधिकाऱ्यांना देऊन आपल्याला न्याय मिळवण्यास नागरिकांनी मदत करावी असे त्यांचे आवाहन आहे.

जिल्हा परिषद मार्केटजवळ ते भीक मागत असून सरकारी अधिकारी यांनी त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली होती मात्र आपल्याकडे त्यांना देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून आपण हा प्रकार सुरू केलेला आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. आपण सेवानिवृत्त कर्मचारी असून जिल्हा परिषद कर्मचारी आणि अधिकारी यांना देण्यासाठी आपण लाच मागत आहोत असे त्यांनी म्हटलेले आहे.

मोहन पासवान यांनी पुढे बोलताना , ‘ 1993 मध्ये रोलर ड्रायव्हर पदावरून आपण निवृत्त झालेलो होतो त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात वेतनश्रेणीसाठी अनेकदा न्याय मागितला. तिथे न्याय देखील मिळाला आणि आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने परवानगी देखील दिली मात्र अकाउंटंट यांनी त्यानंतर दोन लाख रुपयांची लाच मागितली. लाच दिली नाही म्हणून गेल्या पाच वर्षांपासून वेतनश्रेणीचा लाभ मिळू शकलेला नाही त्यामुळे अधिकाऱ्यांना देण्यासाठी आपण हि लाच जमा करत आहोत ,’ असे त्यांनी सांगितले आहे .


शेअर करा