अवघ्या सात महिन्यांच्या चिमुरडीचा मृतदेह गटारात आढळला , महाराष्ट्रातील घटना

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना कोल्हापुरातील कळंबा परिसरात समोर आलेले असून अवघ्या सात महिन्यांच्या एका मुलीचा मृतदेह चक्क गटारीमध्ये आढळून आलेला आहे. 23 तारखेला हा मृतदेह आढळला आणि करवीर पोलिसांना या प्रकरणी माहिती देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक निवास पवार तिथे पोहोचले आणि पंचनामा करून त्यांनी हा मृतदेह ताब्यात घेतलेला आहे.

मयत मुलगी ही अवघ्या सात महिन्यांची असून तिच्या अंगावर कुठेही मारहाणीच्या खुणा आढळल्या नाहीत. तिच्या अंगावर कपडे देखील नव्हते मात्र केवळ मुलगी असल्या कारणाने तिला गटारात फेकून देण्यात आल्याची चर्चा परिसरात असून नागरिकांकडे चौकशी केली मात्र यावेळी काहीही माहिती अद्यापपर्यंत हाती लागलेली नाही.

स्थानिक नागरिकांमध्ये सदर मुलगी ही अनैतिक संबंधातून जन्माला आलेली असावी आणि आपले बिंग फुटू नये म्हणून तिचा त्याग करण्यात आलेला असावा अशी देखील चर्चा असून आपल्या मुलीला गटारीत फेकणाऱ्या या नराधम मातापित्यांवर संताप व्यक्त करत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज वरून तात्काळ चौकशी करून आरोपींना अटक करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष अमोल कांबळे यांनी केली आहे .


शेअर करा