पुण्यातील हॉटेल गारवाच्या मालकाच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीचा मृत्यू

शेअर करा

पुण्यातील उरुळी कांचन परिसरातील हॉटेल गारवाचे मालक असलेले रामदास आखाडे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला हॉटेल अशोकाचा मालक बाळासाहेब जयवंत खेडेकर ( वय 58 राहणार उरुळी कांचन तालुका हवेली ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने येरवडा कारागृहात बुधवारी 13 तारखेला निधन झालेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , उरुळी कांचन येथील हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडे यांच्यावर 18 जुलै २०२१ रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तलवारीने वार केलेले होते त्यानंतर 21 जुलै रोजी उपचार सुरू असताना आखाडे यांचा मृत्यू झालेला होता.

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि अशोका हॉटेलचे मालक बाळासाहेब जयवंत खेडेकर यांच्यासोबत तब्बल दहा जणांना अटक केली होती. आरोपींनी व्यावसायिक स्पर्धेतून हा खून घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झालेले होतेआरोपी बाळासाहेब खेडेकर यांच्यासोबत याच्यासोबत दहा जणांवर मोका कायद्याअंतर्गत देखील कारवाई करण्यात आली होती.


शेअर करा