
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना छत्रपती संभाजीनगर इथे समोर आलेले असून मुकुंदवाडी बसस्थानकासमोर आरजू हॉटेलमध्ये एका ग्राहकाने बिर्याणीची ऑर्डर दिलेली होती मात्र बिर्याणी चांगली नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने नूडल्स ऑर्डर केले मात्र नूडल्स देखील खराब असल्यामुळे मालकाकडे तक्रार केली त्यावेळी मालकाने ‘ तुझे हे नेहमीचेच झालेले आहे ‘ असे म्हणत लोखंडी कवचाने ग्राहकाचे डोके फोडलेले आहे. सदर प्रकरणी हॉटेलचा मालक आणि इतर कर्मचाऱ्यांवर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , राजू कान्हू पटेकर पट्टेकर ( वय 34 ) असे जखमी झालेल्या ग्राहकाचे नाव असून राजू हे मुकुंदवाडी बसस्थानक परिसरात अर्जुन हॉटेलमध्ये गेलेले होते त्यावेळी त्यांनी बिर्याणी आणि नूडल्सची ऑर्डर दिलेली होती. बिर्याणी ऑर्डर कर्मचारी पॅक करत असताना बिर्याणी खराब असल्याचे लक्षात आले म्हणून त्यांनी सध्या फक्त नूडल्स घेऊन जातो असे म्हटले त्यावेळी कर्मचाऱ्यांनी काउंटरवर बोला असे सांगितले.
राजू हे काउंटरवर आले त्यावेळी हॉटेल मालक रफिक पटेल याला त्यांनी ही बाब सांगितली त्यावेळी रफिक याने ‘ तुम्ही फार मस्तीला आलेला आहात ‘ असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली आणि त्यानंतर हॉटेलच्या टेबलवरील लोखंडी कवच राजू यांच्या डोक्यात मारले त्यात त्यांचे डोके फुटलेले आहे. हॉटेल मालकाने कामगारांना देखील याला मारा असे सांगितले त्याचवेळी पाच दहा लाख रुपये गेले तरी चालतील पण याला मारून टाका असे देखील तो म्हणाला असे तक्रारदार व्यक्ती यांचे म्हणणे आहे. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.