गूढ उलगडलं..पुण्यातील ‘ त्या ‘ घटनेत अखेर आईवडिलचं निघाले आरोपी

शेअर करा

पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना बारामती परिसरात समोर आलेली असून दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या स्वतःच्या मुलाचा वयोवृद्ध दांपत्याने सुपारी देऊन खून घडून आणलेला आहे. आरोपी मजूर दांपत्य आणि सुपारी घेऊन खून करणारे तीन जण अशा पाच जणांना बारामती तालुका पोलिसांनी अखेर अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सौरभ पोपट बाराते असे मयत व्यक्ती याचे नाव असून याप्रकरणी आरोपी पोपट भानुदास बाराते ,मुक्ताबाई पोपट बाराते , बबलू तानाजी पवार , बाबासाहेब उर्फ भाऊ गजानन गाढवे , अक्षय चंद्रकांत पाडळे अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

26 तारखेला एका तरुणाचा मृतदेह बारामती तालुक्यातील शिरसुफळ इथे असलेल्या तलावात आढळून आलेला होता त्यानंतर तपास सुरू असताना अखेर या मृतदेहाची ओळख पटली त्यानंतर हा मृतदेह सौरभ बाराते याचा असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांकडे चौकशी केली आणि त्यांनी उत्तरे दिल्यानंतर त्यांच्यावर संशय बळावला.

पोलिसांनी त्यानंतर बाराते दाम्पत्याची मुलगी हिच्याकडे चौकशीला सुरुवात केली त्यावेळी सत्य समोर आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अखेर मुलगा सौरभ हा दारू पिऊन आई-वडिलांना त्रास देत असायचा सोबतच मला आणि माझे पती यांना देखील तो त्रास द्यायचा त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून एक लाख 75 हजार रुपयांची सुपारी तीन आरोपींना दिलेली होती आणि त्यांनी त्याची हत्या केली अशी कबुली मुलाच्या आईने दिलेली आहे

पोलीस अधीक्षक अंकित गोयल , अप्पर विभागीय अधीक्षक आनंद भोईटे , उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे , पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी सहाय्यक , फौजदार कल्याण शिंगाडे यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे .


शेअर करा