गूढ उलगडलं..महिलेची आधीही झाली होती दोन लग्ने

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले पाटणा येथील फुलवारी शरीफ इथे उत्तर प्रदेशातील एका तरुणाच्या मृत्यूचे रहस्य अखेर उलगडण्यात पोलिसांना यश आलेले आहे. सासू-सासरा आणि पत्नी या तिघांनी मिळून या तरुणाचा गळा आवळून खून केलेला होता. मयत व्यक्तीची पत्नी असलेली अस्मिरी खातून उर्फ मंजू देवी हिने यापूर्वी दोनदा लग्न केले आणि सुभाष हा तिचा तिसरा पती होता. सुभाष प्रजापती असे मयत व्यक्तीचे नाव असून त्याच्या भावाच्या म्हणण्यानुसार त्याच्या वहिनीचे इतरत्र प्रेमसंबंध होते आणि तिला चौथ्यांदा लग्न करायचे होते म्हणून तिने पतीची हत्या केली.

सुभाष प्रजापती याचा दोन वर्षांपूर्वी फुलवारी शरीफ येथील अस्मिरी खातून हिच्यासोबत विवाह झालेला होता. मयत व्यक्ती याला अमली पदार्थाचे व्यसन होते आणि त्यामुळे त्याचे पत्नीसोबत सातत्याने भांडण होत होते त्यातून त्याची हत्या करण्यात आली असा पोलिसांचा दावा आहे मात्र मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पोलिसांचा दावा फेटाळून लावलेला आहे.

अस्मेरी खातून हिचे दोनदा लग्न झाले होते आणि दोन्ही पतींना सोडल्यानंतर तिने सुभाष प्रजापती यांच्यासोबत दोन वर्षांपूर्वी तिसरे लग्न केले. मयत व्यक्ती याचा भाऊ ब्रिजेश प्रजापती याने बोलताना यांनी या प्रकरणी बोलताना हिने आपल्या भावाला पद्धतशीरपणे जाळ्यात ओढले आणि त्यानंतर त्याच्यासोबत लग्न केले . तिला आधीच्या पतीपासून दोन मुले देखील आहेत असे म्हटलेले आहे.

सुभाष याची पत्नी असलेली असलेली खातुन हिचे इतरत्र अनैतिक संबंध होते आणि सुभाष याचा मृत्यू झाल्यानंतर तिला चौथ्यांदा त्याच्यासोबत लग्न करायचे होते याची माहिती सुभाष याच्या कुटुंबीयांना मिळालेली होती म्हणून त्यांनी अस्मिरी हिला विरोध सुरू केला त्यामुळे तिने तिची आई सासरा यांना मदतीला घेत सुभाष याचा दोरीने गळा आवळून खून केला असे म्हटलेले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी माध्यमांशी बोलताना शुक्रवारी सुभाष प्रजापती यांचा मृतदेह शेतात सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. मयत व्यक्तीच्या मानेवर पोलिसांना खुणा आढळल्या त्यावरून तपासाला सुरुवात झाल्यानंतर ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले आणि अखेर अस्मिरी खातून आणि तिच्या कुटुंबीयांना अटक करण्यात आली.


शेअर करा