पुणेकरांना ‘ बिटकॉइन ‘ चा मोह सुटेना , मुळे काकांनी गमावले इतके कोटी

शेअर करा

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणेकरांना गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टो करन्सी आणि बिटकॉइनचा लळा लागलेला असून यामध्ये अनेक जणांची आतापर्यंत फसवणूक झाली आहे मात्र अद्यापही पुणेकरांवर असलेली डिजिटल कॉइनची मोहिनी कमी झालेली नाही. असाच एक नवीन प्रकार आता भोसरी परिसरात समोर आलेला असून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने तब्बल एक कोटी 27 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, जगदीश दत्तात्रेय मुळे ( वय 46 राहणार इंद्रायणी नगर भोसरी ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून संबंधित व्हाट्सअप क्रमांक धारक टेलिग्राम आयडी धारक असलेला सांग नावाचा व्यक्ती आणि मिस यांना कार्शिअन आलस्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

जून महिन्यांपासून तर ऑगस्ट महिन्यांपर्यंत हा फसवणुकीचा प्रकार घडलेला असून आरोपी व्यक्तींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना क्रिप्टोकरेन्सीमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग केले तर तुम्हाला चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवलेले होते. मोठ्या रकमेचे आमिष दाखवल्यानंतर फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना क्रिप्टो करेन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. आरोपींनी तब्बल १ कोटी २७ लाख रुपये लुटलेले असून आरोपींनी हे पैसे स्वतःसाठी वापरले आणि फिर्यादी यांची फसवणूक केली असे तक्रारदार व्यक्ती यांचे म्हणणे आहे.


शेअर करा