
पुणे जिल्ह्यामध्ये शिक्रापूर इथे चोरीचा एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून शिक्रापूरच्या व्हीनस वाईन शॉपमध्ये सुमारे लाखो रुपयांची चोरी करून जून महिन्यात फरार झालेला आरोपी हा चक्क उत्तर प्रदेशमध्ये आढळून आलेला आहे. उत्तर प्रदेशच्या एसटीएफ पथकाने त्याला ताब्यात घेतलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, भानु प्रताप सिंह असे आरोपी व्यक्तीचे नाव असून एका परिचित असलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून तो व्हीनस वाईन शॉप इथे मॅनेजरची नोकरी करत होता. जून महिन्यात सीसीटीव्ही खराब असल्याचा फायदा घेत त्याने सुमारे दोन लाख वीस हजार रुपयांचे रक्कम चोरली आणि त्यानंतर तो उत्तर प्रदेशात पळून गेला. शिक्रापूर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
शिक्रापूर पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलीस यांचे संयुक्त पथक त्याचा शोध घेत होते त्यावेळी आरोपी हा लखनऊच्या लेखराज मार्केटमध्ये एका बारवर काम करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले त्यानंतर पोलीस निरीक्षक अंजनी तिवारी यांनी महाराष्ट्र पोलिसांना सोबत घेऊन त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत. फरार होण्याआधी त्याने आणखीन पाच लाख रुपयांची चोरी केल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे.